आवृत्ती पुणे
← Back to Homepage

संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

भुम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच संदीप मगर, दादासाहेब रामगुडवे, अनंतराव रामगुडवे, महादेव शिंदे, बालाजी रामगुडवे, शालेय समितीचे नागेश साखरे, सनी रामगुडवे, प्रशांत कदम, बिरमल रामगुडवे, मन्मथ रामगुडवे, निलेश टेकाळे, बाबासाहेब क्षीरसागर, अनिकेत रामगुडवे, बाबा रामगुडवे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();