आवृत्ती पुणे
← Back to Homepage

समर्पित आजी-आजोबांना माता त्रिशला माई रमा पुरस्कार प्रदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 22, 2024
Spread the love

स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सतर्फे आयोजन

पुणे: स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या वतीने महावीर कल्याणक दिनानिमित्ताने तळेगाव वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबाच्या सानिध्यात माता त्रिशला माई रमा पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल जीवनबाई सुनील पगारिया (वय वर्ष 100), सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या लीला मधुसूदन कुलकर्णी (वय वर्ष 88) यांचाही सन्मान करण्यात आला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेवाभावी महिला व वानप्रस्थ आश्रमातील सचिव उर्मिला भरतकुमार छाजेड यांना माता त्रिशला व माई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे वितरण हस्ते महावीर भगवान अहिंसा ट्रस्ट निगडीचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील, जैन महासंघ पिं. चिं.चे अध्यक्ष उमेश पाटील, वानप्रस्थ आश्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मुळे, स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब, समाजसेविका अलका भळगट, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा सुरेखा कटारिया, प्राध्यापक प्रकाश कटारिया, सुभाष सुराणा यांच्या उपस्थितीमध्ये व वानप्रस्थ आश्रमातील आजोबाजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या आनंदात पार पडला.

या निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता राठोड यांनी केले. त्यात वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बंब यांनी केले स्वानंद सखीचे मनोगत सुनीता लुणावत यांनी केले.

कांचनमाला बाफना व स्वानंद ग्रुप यांनी स्वागतगीत व कल्पना शिंगवी या स्वानंद ग्रुपने नवकार महामंत्र सादर करून भावनिक वातावरण निर्माण केले. प्रा. सुरेखा कटारिया यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ श्वेता राठोड, उज्ज्वला कुंकूलोळ, कल्पना बंब, सविता भंडारी यांनी केले.

get_footer();