आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे सरहद शौर्याथॉन २०२४ स्पर्धा

Spread the love

पुणे : झोजिला खिंडीतील युद्ध विजयास ७५ वर्षे आणि कारगिल युद्ध विजय दिवसास २५ वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडियन आर्मी, सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे कारगिलमध्ये सरहद शौर्याथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्पर्धकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कारगिलच्या पहाडी प्रदेशात ३० जून २०२४ रोजी सकाळी “सरहद शौर्याथॉन २०२४ (४४ की. मी.) स्पर्धा पार पडली. झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रास या पहाडा तीलमार्गावर ही स्पर्धा पार पडली. या मुख्य स्पर्धेत ५५ पुरुष आणि ५ महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेतील पुरुष, महिला आणि मुले, मुली इतर रोड रेसेस (२५,१०,७.५ आणि ४ किमी अंतराच्या) पार पडल्या.

एकूण १४०० धावपटूंनी (पुरुष, महिला आणि मुले – मुली) स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप आठव्या माऊनटण डिविजनचे मेजर जनरल सचिन मलिक आणि सरहद पुणे चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम पुणे चे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांचे हस्ते करण्यात आले.

विजेत्यांना ४ लाखांची रोख पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी ब्रिगेडियर सुमित अब्रोल, कर्नल अभिषेक चरक, लेफ्ट. कर्नल संदीप दुलहत, लेफ्ट. कर्नल राजेश बांधे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

get_footer();