आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत राबवली मोहीम

Spread the love

बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या विभागीय कार्यालयाकडून सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबविण्यात आली.

प्रशासक तथा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्साद यांच्या सुचनेनुसार ही मोहीम राबवली. समाजातल्या सर्व स्तरांमधून तसंच अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्र आणि घटकामधून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबावा, सिंगल यूज प्लास्टिकचं पूर्णपणे निर्मूलन व्हावं, यासाठी येणाऱ्या काळात सुद्धा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तपासणी मोहिमा अधिक तीव्र करणार आहेत.

त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक टाळा असे आवाहन बार्शी नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी केले. किराणा दुकाने, फुल विक्रेते, भाजी मंडई, पदपथांवरचे हातगाडे व प्रमुख बाजारपेठ याठिकाणी ही मोहीम राबवून जवळपास २२ किलो सिंगल युज प्लास्टिक गोळा करण्यात आले.

सदर मोहीम आरोग्य विभागाकडील स्वच्छता निरिक्षक – हर्षल पवार, लोकेश काकडे, अर्जुन कांबळे, मुकादम- नेमीनाथ पवार, सोमनाथ झोंबाडे तसेच सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने राबविण्यात आली.

get_footer();