आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सिकंदर शेख ठरला ५ लाखांच्या बक्षिसाचा मानकरी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 23, 2024
Spread the love

माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा

भूम : माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त भूम शहरात भरवण्यात आलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख हे पाच लाख रूपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. त्यांनी पंजाब केसरी पै. भोला सिंग याला चितपट केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या वतीने ही कुस्ती लावली होती.

भूम शहरातील ग्रामदैवत आलम प्रभू देवस्थानच्या नजीक असलेल्या कुस्ती संकुलमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ करण्यात आला होता.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत. युवा नेते साहिल गाढवे, जिल्हापरिषद माजी सदस्य दत्ता साळ- खे, दत्ता मोहिते, गौतम लटके, उद्धव साळवी, दत्ता गायकवाड, रामकिसन गव्हाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, बिबीशण खामकर, नितीन चेडे, नागनाथ नाईकवाडी, सुरज गाढवे, बालाजी अंधारे, दत्ता नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, शहर प्रमुख संजय पवार, उद्योगपती संजय साबळे आदी उपस्थित होते. दोन नंबरच्या कुस्तीत पै. दादूमियाँ मुलानी (कुर्ड- वाडी) याने पै. अण्णा विरमाने याला चितपट करत अलमप्रभू केसरीचा मान पटकावला. कै. पै. हादी सय्यद मित्र मंडळाच्या वतीने त्याला एक किलो चांदीची गदा व संजय गाढवे यांनी तीन लाख रुपयांचे बक्षीस दिले. तीन नंबरच्या कुस्तीमध्ये पै. मनोज माने (कुडूवाडी) यांने ऋषीकेश आरकिलेला निकाल डावावर चितपट केले. या कुस्तीसाठी संजय गाढवे यांनी २ लाखाचे बक्षीस दिले. चौथ्या कुस्ती मध्ये पै. अनिल जाधव याने पै. बंटी कुमार याच्यावर विजय मिळवला. या कुस्तीसाठी विनोद गपाट यांच्या वतीने १ लाख ५१ हजार बक्षिस देण्यात आले. या कुस्ती मैदानासाठी काही दानशूर व्यक्तींनी बक्षिसे दिली. कुस्ती मैदानासाठी २५ लाख रुपये संजय गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त खर्च करण्यात आले. कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मातबबर पैलवानांनी हजेरी लावली होती. यात महाराष्ट्र केस- री सय्यद चाऊस, कुस्ती सम्राट असलम काझी, पै. धनंजय भुजबळ, पै. धनंजय मदने, पै. राजभाऊ देवकते (वाकडी) आदी उपस्थित होते. कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून वस्ताद हुसैन सय्यद, मामू जमादार, धनू गाढवे, आण्णा पवार, डॉ. इंगोले, सचिन साबळे, चांद सय्यद, शंकर गाढवे, शिवलिंग शेंडगे, विकास तांबे, सोमनाथ मोरे, अमोल कदम, समाधान गाढवे, अमोल भोसले, अंगद भोसले, अक्षय गाढवे, गणेश काळे, योगेश साळुंके यांनी काम पाहिले.

get_footer();