आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सिध्दी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात ३५१ बाटल्यांचे संकलन

Spread the love

सोळाव्या रक्तदान शिबीरात सौ. सिध्दी छाजेड नहार यांनी केले रक्तदान

पुणे : सिद्धी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३५१ जणांनी रक्तदान केले. पुण्यातील नवी पेठेतील आनंदऋषीजी रक्तपेढी येथे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

स्व़ मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १६ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जाते़. रक्तदान शिबीरात सौ़. सिध्दी छाजेड नहार यांनी रक्तदान केले़. सिद्धी फाऊंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड, अध्यक्ष ललित जैन आणि मुकेश छाजेड हे या शिबिराचे आयोजन करतात़. यंदा तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे़.

त्यापार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर महत्वाचे मानले जात आहे़. याबाबत मनोज छाजेड म्हणाले की, दरवर्षी २१ मे रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्याची सिद्धी फाऊंडेशनरची परंपरा आहे़. गेल्या तीन ते चार वर्षांत कोरोना आणि इतरही संकटे आली, तरीही आम्ही शिबिरात खंड पडू दिला नाही.


दरवर्षी मे महिन्यात शहरात रक्ताची कमतरता असते, ती उणीव भरून काढण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून सिद्धी फाऊंडेशन, आमचा मित्रपरिवार आणि इतर मंडळींनी यावर्षीही रक्तदान शिबीर यशस्वी केले़. गेल्या १६ वर्षांत तब्बल ३३ हजार रक्तबाटल्यांचे संकलन केले़.

या शिबिराप्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिनेंद्र लोढा, शांतीलाल गांधी, लोकेश जैन, नितेश जैन, राम बांगड, नीरज कांकरीया, सिध्दांत छाजेड, योगेंद्र चोरडिया, वैभव सेठीया, जीवन बेद, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सद्यस्थितीत शहरात ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असून कडाक्याचा उन्हाळा आहे़. शहरात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़. सिध्दी फाऊंडेशन दरवर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यात शहरात असणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबीरात प्रतिसाद मिळत असतो ही सकारात्मक बाब आहे.

get_footer();