आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सीटीईटी परिक्षेत ३ लाख ६६ हजार उमेदवार ठरले पात्र

Spread the love

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय पात्रता परीक्षा जुलै २०२४ (सीटीईटी) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी उमेदवारांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर गुण पाहता येतील अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.

इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यासाठी वर्षातून दोन वेळा सीटीईटी परीक्षा घेण्यात येते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दि. ७ जुलै रोजी भारतातील १३६ शहरांत वीस भाषांमध्ये सीटीईटी २०२४ परीक्षेचे आयोजन केले होते. यंदा पेन आणि पेपरच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षेची उत्तरतालिका तसेच परीक्षार्थी उमेदवारांची ओएमआर शीट बुधवारी दि. २४ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. तसेच उत्तरावर आक्षेप घेण्यासाठी दि. २६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षकांसाठी पेपर १ तर इयत्ता ६ वी ते ८ वी शिक्षकांसाठी पेपर २ पात्र होणे अनिवार्य आहे.

सीबीएसईच्याउमेदवारांना https://ctet.nic.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच डिजीलॉकर पोर्टलवरून मोबाइल क्रमांकाच्या साहाय्याने सीटीईटी पात्रता प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका डाउनलोड करता येणार आहे.

सीटीईटी पेपर एकमध्ये १ लाख २७ हजार १५९ आणि पेपर दोनमध्ये २ लाख ३९ हजार १२० असे एकूण ३ लाख ६६ हजार २७९ उमेदवार पात्र झाले आहेत.

get_footer();