आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुरैल भक्तिगीतांत ‘दिवाळी पहाट’ न्हाऊन निघाली

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • October 22, 2025
Spread the love

पुणे : दिव्यांची झगमग, फटाक्यांची आतषबाजी आणि सुरेल भजनांच्या स्वरांनी सजलेली ‘दिवाळी पहाट’ भक्तिमय वातावरणात पार पडली. माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

माँ आशापुरा माता मंदिर परिसरात दिवे आणि पणत्या लावून दीपोत्सवाची अप्रतिम आरास करण्यात आली. सकाळच्या शुभप्रसंगी महाआरती पार पडली. विशेष म्हणजे, लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या जोडप्यांना आरतीचा मान देण्यात आला.

यानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (यू.के.) पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक विवेक पांडे आणि प्रिशिता पांडे यांनी सुमधुर भजनांची मैफल रंगवली. “पायो जी मैंने रतन धन पायो”, “मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा”, “अच्युतम केशवम”, “चलो बुलावा आया है माता ने बुलाया है” यांसारखी अनेक भक्तिगीते सादर होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

या प्रसंगी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष गोपाल अगरवाल, लायन श्याम खंडेलवाल, लायन मंगेश कटारिया, लायन राजेंद्र गोयल, लायन जिनेंद्र लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रद्धावान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळी पहाटीचे सौंदर्य अनुभवले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरेल संगीत, आरतीचा प्रकाश आणि भक्तिभावाच्या लहरींनी माँ आशापुरा मंदिराचा परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला.

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे सण-उत्सवांची परंपरा. हे सण माणसाच्या जगण्याला अर्थ देतात. दिवाळी हा त्यातील सर्वात आनंददायी सण असून, मित्र-परिवारासह तो साजरा करण्यासाठी ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन केले जाते. लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने सर्व मित्र परिवार भेटतो आणि आनंद द्विगुणित होतो. – विजय भंडारी, अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट

get_footer();