आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुलाखे हायस्कूलमधील ग्रेड परीक्षा यशस्वीतांचा सन्मान

Spread the love

बार्शी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय याच्यावतीने दरवर्षी शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात येतात या परीक्षांमध्ये सुलाखे हायस्कूलने सातत्याने कौतुकास्पद यश प्राप्त केलेले आहे.

या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी असणारे नितीन अनवेकर यांनी शिक्षकांच्या संस्कारामुळे विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते असे गौरव उद्गार काढले यावर्षी अ श्रेणी व ब श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

एलमेंटरी अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी:

प्रणिता वाळके, हर्षदा माळी, ज्ञानेश्वरी बरचे, आर्यन मुंडे, एलमेंटरी ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी: श्रावणी बासुतकर, साक्षी काळे, तनीम शेख, तसनिम शेख, संस्कृती खेडकर, वेदिका मसलकर, आर्या कांदे, परिशिष्ट एरंडे, रितू बासुतकर, गार्गी कुलकर्णी, शुक्रा काटकर, प्रणव माळी, सिद्धी व्हनकळस, तन्वी मनगिरे, उत्कर्षा संबळे, स्नेहा कागदे , सिद्धी कांबळे, इंटरमिजीएट

अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी:

यश शेजुळ, सृष्टी मुळे, प्रणव काटकर,

इंटरमिजीएट ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी:

श्रेया राऊत, श्रुतीभालेराव, सानिका मोरे, प्रणाली आंधळकर, अपेक्षा गव्हाणे, समृद्धी माळी, संचिता महाजन, श्वेता शिरगिरे.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक हरिदास कुंभार, रामचंद्र इकारे, दीपक माने यांचाही सत्कार अतिथींच्या हस्ते करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रख्यात मूर्तिकार संजय उपरे फिजिओथेरपीस्ट डॉ.चैतन्य देशपांडे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

get_footer();