आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘सूर्यदत्त’मध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COPT) तर्फे ‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर आधारित जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कॅम्पस व परिसरात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.

कॅम्पसमध्ये ‘फिट है तो, हिट है’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांनी स्क्वॅट्स, प्लँक्स, पुश-अप्स, जम्प रोप आणि बर्पीज यांसारख्या फिटनेस चॅलेंजमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. अंजली शर्मा आणि डॉ. अंजली बैस होत्या यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने केले.

संस्थेचे मुख्य संचालक अधिकारी डॉ. रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्यांनी सातत्यपूर्ण आरोग्य सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘जनजागृती आरोग्य शिबिर’ हा सामाजिक उपक्रम भुकूम (ता. मुळशी) येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आला.

शिबिरात स्थानिक गरोदर महिलांना गर्भधारणेपूर्वी आणि नंतरच्या टप्प्यांमधील आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. अमृता तोमर आणि डॉ. आकांक्षा वडोळकर यांनी केले.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आशिया शेख व मनीषा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. फिजिओथेरपीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी व्यायामाचे सत्र घेतले व मातृत्व काळातील आरोग्य व सुरुवातीपासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे महत्त्व सांगितले.

प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लवकर वयात आरोग्यविषयी जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा सर्वसमावेशक उपक्रम वैयक्तिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक आरोग्य जागृती वाढवण्याच्या सूर्यदत्त संस्थेच्या कटिबद्धतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. आरोग्यदायी आणि आशावादी भविष्यासाठी भक्कम पाया घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

get_footer();