आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स तर्फे प्रदूषण जनजागृती व नियंत्रण अभियान

Spread the love

पिंपरी : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COP) तर्फे पुण्याच्या विविध भागांमध्ये दोन दिवसीय क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) जनजागृती आणि फुफ्फुस आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वाढत्या प्रदूषणाच्या परिस्थितीत वाहतूक पोलीस दिवसेंदिवस धूर, धूळ आणि वाहनांच्या उत्सर्जनाला सामोरे जातात. त्यामुळे त्यांच्या श्वसन आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या उपक्रमाचा उद्देश वाहनांच्या धुराच्या उत्सर्जनामुळे आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे दीर्घकाळ बाहेर ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या श्वसनविकारांच्या धोक्याकडे लक्ष वेधणे हा होता.

या दोन दिवसांत एकूण 102 वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. फिजिओथेरपी टीमने सर्वसाधारण श्वसन तपासणी तसेच पीक एक्स्पायरेटरी फ्लो रेट (PEFR) चाचणी करून फुप्फुसांची कार्यक्षमता आणि हवेच्या प्रवाहातील अडथळे तपासले.

याच सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरांतर्गत वाकड ट्रॅफिक पोलीस चौकी आणि एसपी हायवे ट्रॅफिक ऑफिस, बावधन येथे वाहतूक पोलिसांची विविध शारीरिक व श्वसनविषयक तपासणी करण्यात आली.

पोलिस कर्मचाऱ्यांना सीओपीडीबाबत जनजागृती, लक्षणे ओळखण्याचे मार्गदर्शन, फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सूचना देण्यात आल्या. हा उपक्रम वाहतूक पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी सूर्यदत्त समूहाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रत्यक्ष प्रतीक ठरला.

पोलिस कर्मचाऱ्यांना सीओपीडीचे कारणे, सुरुवातीची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याबाबत संवाद, प्रात्यक्षिके आणि माहितीपत्रकांद्वारे मार्गदर्शन केले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ड्युटीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षक फेस मास्कचे वितरण करण्यात आले आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

तसेच श्वसन व्यायाम, पुरेशी पाण्याचे सेवन, आरोग्यदायी जीवनशैली आणि फुप्फुसांचे रक्षण करण्याच्या तंत्रांचीही माहिती देण्यात आली. या उपक्रमाच्या आयोजनामागे सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले.

समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी आवश्यक असलेल्या जनजागृती उपक्रमांना ते नेहमीच समर्थन देत असून, अशा सामुदायिक उपक्रमांबाबत त्यांची दूरदृष्टी टीमसाठी प्रेरणादायी ठरते. संस्थेच्या आरोग्यविषयक सर्व उपक्रमांना उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आणि सह-उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनीही सक्रिय पाठिंबा, समन्वय आणि आवश्यक मार्गदर्शन दिल्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता आला.

एसपी हायवे ट्रॅफिक ऑफिस येथे अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, पोलिस कर्मचाऱ्यांना नियमितपणे मास्क वापरण्याचे व श्वसन व्यायाम करण्याचे आवाहन केले आणि संस्थेचे आभार मानले. उपनिरीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी उपक्रमाच्या सुरळीत आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाकड ट्रॅफिक पोलीस चौकी येथे एपीआय माधव थोरात, पीएसआय रोहित दिवटे, एपीएसआय नवनाथ खेड़कर व पोलीस नाईक शेखर बविस्कर यांनी उपक्रमात पूर्ण सहकार्य केले. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना नियमित मास्क वापरणे, तंदुरुस्ती राखणे आणि शिकवलेले श्वसन व्यायाम अवलंबण्यास प्रोत्साहित केले.

या आरोग्यवर्धक आणि अत्यावश्यक उपक्रमासाठी SIHS-COP चे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी SIHS-COP चे प्राचार्य डॉ. सीमि रेथारेकर यांनी सीओपीडीविषयी मार्गदर्शन केले, सोपे श्वसन व्यायाम, जीवनशैलीत बदल व फुप्फुस निरोगी ठेवण्याचे उपाय शिकवले.

हा उपक्रम कार्डिओव्हॅस्क्युलर-रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. राजकिरण टिकू, डॉ. श्रीधर श्रीरोडकर आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. मानसी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी तपासण्या, प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. वाहतूक पोलिसांनी या उपक्रमाचे कौतुक करत, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा आरोग्य तपासणी आणि जनजागृती कार्यक्रमांची वेळेवरची गरज असल्याचे सांगितले.

त्यांनी आपल्या दैनंदिन कर्तव्यात श्वसन आरोग्याची किती महत्त्वाची भूमिका आहे, याची जाणीव या उपक्रमामुळे अधिक स्पष्ट झाली असल्याचेही व्यक्त केले. या माध्यमातून सूर्यदत्तचे सार्वजनिक आरोग्य संवर्धन आणि प्रतिबंधात्मक फिजिओथेरपीच्या प्रसारासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित झाले.

सूर्यदत्त भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून अग्रिम पंक्तीतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील आणि दीर्घकालीन श्वसन आजारांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत राहील अशी हमी डॉ चोरडिया यांनी दिली.

← Back to Homepage

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला ‘अ’ श्रेणी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 20, 2024
Spread the love

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला (एसआयएमएमसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (नॅक) शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे. या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेल्या मान्यतेमुळे सूर्यदत्तची शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता आणि गुणवत्ता मानके उंचावण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.

‘नॅक’कडून मूल्यांकनाची ही प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राबविण्यात आली. यामध्ये संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यात आले. अभ्यासक्रमाचे पैलू, अध्यापन, शिक्षण आणि मूल्यांकन, संशोधन, नवोपक्रम आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची साधने, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांची प्रगती, तसेच शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा प्रभावी उपयोग सिद्ध करीत सूर्यदत्तने ‘नॅक’ मूल्यांकनात पुन्हा एकदा ‘अ’ श्रेणीवर आपला ठसा उमटवला.

सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी या यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. ‘नॅक’कडून मिळालेल्या ‘अ’ श्रेणीमुळे आमचे मनोधैर्य वाढले असून, आणखी जोमाने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

या यशात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी समर्पित भावनेने केलेले परिश्रम, दिलेला सहभाग महत्वाचा आहे. सूर्यदत्त समूह समकालीन आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे, उद्योगाच्या सध्याच्या गरजांनुसार उच्च दर्जाचे संशोधन आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यासह सर्वांसाठी शिक्षण हे आमचे ध्येय आहे.

हे ध्येय साध्य करण्यासाठी यापुढेही आम्ही प्रयत्न करत राहू, अशी भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली. ‘सूर्यदत्त’ समूहातील ‘एसआयएमएमसी’ ही व्यवस्थापनाचे शिक्षण देणारी महत्वपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.एआयसीटीई -सीआयआय रँकिंग मध्ये गेली सहा वर्ष प्लॅटिनम तर टॉप फिफ्टी बी स्कूल्स मध्ये हि सातत्याने प्लॅटिनम रँकिंग प्राप्त झाले आहे.

व्यावसायिक नेतृत्व घडविण्यासाठी नवीन अध्यापन पद्धती, अत्याधुनिक संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची वचनबद्धता यावर संस्थेने भर दिलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेने एमबीए व एमसीए , बीबीए , बीसीए हे पूर्ण वेळ, तर ‘पीजीडीएम’ हा अर्धवेळ अभ्यासक्रम चालविण्यात येतो. ‘सूर्यदत्त’ मध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनोखे शिक्षणशास्त्र अवलंबले जाते. त्यामध्ये अनुभवाधारित, सर्वसमावेशक, एकात्मिक, शोधाभिमुख, विद्यार्थी-केंद्रित, चर्चाधारित, लवचिक आणि आनंददायक शिक्षणाचा समावेश आहे.

स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठी येथे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर चालवले जाते. विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख वृत्ती विकसित व्हावी, यासाठी स्टार्टअप फेस्टिवल, डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, प्रात्यक्षिक शिक्षणाची सत्रे, उद्योग कल्पनांच्या स्पर्धा, सेमिनार्स, हॅकेथॉन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद व सहली आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते.

एआयएमए बिझ लॅब, इनोव्हेशन नेक्स्ट लॅब, एआय लॅब या स्वरूपात येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

उद्योग क्षेत्रातील नवे प्रवाह, बदल विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी मार्गदर्शन केले जाते.अलुमिनि सेल चा यामध्ये असणारा सहभाग महत्वपूर्ण असतो. संस्थेला मिळालेल्या ए श्रेणीमुळे संस्थेस स्वायत्तता मिळणे शक्य झाले आहे.

या करीता संस्थेचे व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. यामुळे नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांना आवश्यक परंतु नवे असे अभ्यासक्रम अंतर्भूत करणेचा संस्थेचा मनोदय सफल होईल. वर्ष २०२५-२६ पासून असे अभ्यासक्रम सुरु करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

प्रा डॉ संजय बी चोरडिया संचालक एसआयएमएमसी, कोअर टीम नॅक व व्यवस्थापन तसेच शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, भागधारक यांचे सुषमा चोरडिया उपाध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन यांनी संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, यांच्या वतीने अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त केल्या.

get_footer();