आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • February 23, 2024
Spread the love

सिद्धी कंधारे सर्वप्रथम

पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या पाच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाजी मारली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएस्सी एचएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या (एससीएचएमटीटी) विद्यार्थ्यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे.

सिद्धी कंधारे (७७.३६ टक्के), नचिकेत वेलणकर (७४.७६ टक्के) आणि सिद्धेश्वर सातपुते (७४.२० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यापीठाअंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर येथील १५ महाविद्यालयातून १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२३ मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला.

त्यामध्ये सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विशेष श्रेणीसह प्रथम श्रेणी मिळाली.

गेली अनेक वर्षांपासून मिळत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करीत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्रा. अतुल देशपांडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘ नॅक’ अधिस्वीकृतीधारक आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००४ मध्ये झाली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे हे अधिकृत केंद्र आहे. ‘एससीएचएमटीटी’तर्फे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येतात.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक घडविण्यावर येथे भर दिला जातो. अभ्यासक्रमातील शिक्षणासोबतच ‘एससीएचएमटीटी’ च्या वतीने औद्योगिक कंपन्यांना भेटी, तज्ज्ञांचे सेमिनार्स, संकल्पनेवर आधारित भोजन, फूड फेस्टिवल आयोजिले जातात.”

“या क्षेत्राचे सखोल आणि प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना घेता यावे, यासाठी विविध उपक्रम राबवून त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास प्रोत्साहित केले जाते.

जागतिक स्तरावरील स्वरूपाचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे, यासाठी नामांकित वैश्विक संस्थांशी ‘एससीएचएमटीटी’ने सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपिटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट (एएचएलईआय) आदी संस्थांचा समावेश आहे.

‘जीएचआरडीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘एससीएचएमटीटी’चा समावेश टॉप हॉटेल मॅनेजमेंट इन्सिट्यूट्स ऑफ एक्सलन्स इन इंडियामध्ये, तसेच महाराष्ट्रातील प्रायव्हेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवर्ग क्रमवारीत समावेश झाला होता,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया पुढे म्हणाले, “तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम पायाभूत सुविधा ‘एससीएचएमटीटी’ मध्ये आहेत. ‘एससीएचएमटीटी’ ने आजवर विक्रमी प्लेसमेंट्स केल्या आहेत.

देशात आणि विदेशात ‘एससीएचएमटीटी’ चे विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर घडवत आहेत. सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत सूर्यदत्ताचे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत.

मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेलात सूर्यदत्तचे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.”

get_footer();