आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीला इंडियन इन्स्टिट्यूशनलरँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात १९ वे स्थान, महाराष्ट्रातील बीसीए कॉलेज क्रमवारीत पहिले स्थान

Spread the love

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात १९ वे स्थान, महाराष्ट्रातील बीसीए कॉलेज क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त झाले आहे.

क्रमवारी नुकतीच एज्युकेशन पोस्ट मासिकात प्रकाशित झाली आहे. या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ‘आयआयआरएफ’ क्रमवारी तज्ज्ञाच्या सखोल विश्लेषनाच्या आधारे करण्यात येते.

ही क्रमवारी भारतातील अतिशय वैविध्यपूर्ण आणि अधिकृत असून, कॉर्पोरेट जगतामध्ये या क्रमावरीला अतिशय महत्व आहे. रोजगारक्षमता, शिक्षण-अध्यापन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पादन व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन, बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन या सात कामगिरीच्या निर्देशांवर आधारित ही क्रमवारी ठरवली जाते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (एससीएमआयआरटी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आहे.

या महाविद्यालयात बॅचलर्समध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आर्टस्, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, अनिमेशन, सायकोलॉजी, सायबर सिक्युरिटी या विषयांचे, तर तर मास्टर्सकरीता कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटेस्टिक्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, मीडिया अँड जर्नालिझम, सायकोलॉजी, कॉमर्स आदी क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत करिअरसाठी मूल्यवर्धित प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे आहेत. ही संस्था ‘नॅक’ श्रेणीप्राप्त आहे.”

get_footer();