आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूलची औद्योगिक भेट

Spread the love

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या “ज्ञानातून सेवा” या तत्वज्ञानाला अनुसरून सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूल यांनी संयुक्तपणे कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. प्रवाहांच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन केले.

या औद्योगिक भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसंस्था चितळे बंधू मिठाईवाले (रांजे युनिट, खेड शिवापूर) आणि कात्रज डेअरी, पुणे यांना भेट दिली. विद्यार्थ्यांना या दोन्ही उद्योगांच्या कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, वितरण व्यवस्थापन तसेच ग्राहक समाधानाचे तंत्र याविषयी सखोल माहिती मिळाली.

या फील्ड ट्रिपचा उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक जगतातील प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देणे, विविध क्षेत्रांतील संधींची ओळख करून देणे आणि भविष्यातील करिअरसाठी त्यांना प्रेरणा देणे हा होता. विद्यार्थ्यांनी या भेटीचा उत्साहाने सहभाग घेतला आणि उद्योग क्षेत्रातील नव्या संकल्पना जाणून घेतल्या.

प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

← Back to Homepage

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक इंग्रजी दिवस साजरा

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक इंग्रजी दिवस साजरा करण्यात आला. साहित्यविश्वातील एक महान नाटककार, अभिनेता विलियम शेक्सपिअर यांच्या जन्म व मृत्यूदिनी जगभरात इंग्रजी दिवस साजरा केला जातो. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

इंग्रजी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर, जॉन किट्स, विलियम वर्ड्सवर्थ, रॉबर्ट फ्रॉस्ट, इमायली डिकन्सन यांच्या इंग्रजी कवितांचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी विख्यात इंग्रजी लेखक रस्किन बॉण्ड यांच्याविषयी माहिती जाणून घेतली.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या प्राचार्य किरण राव यांनी संवादात इंग्रजी भाषेचे महत्व सांगताना इंग्रजी भाषा बोलण्यात भारत दुसऱ्या स्थानावर असल्याचे नमूद केले.

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वंदना पांड्ये यांनी विलियम शेक्सपिअर आणि विलियम वर्ड्सवर्थ यांच्या काही महत्वाच्या ओळींचे वाचन केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संयोजन इंग्रजीच्या शिक्षिका प्राची केळकर यांनी केले. सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये आनंदाने सहभाग घेतला.

अक्षर आणि वर्णमाला यात काय फरक आहे? या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य पेहराव करीत पोस्टर्स, चार्ट्समधून इंग्रजी भाषा, व्याकरण, कविता याचे दर्शन घडवले. कला शाखेचा विद्यार्थी शरण्य चक्रवर्ती याने कार्यक्रमाचे संचालन केले. गती भार्गव, भूमी त्रिवेदी, अश्विनी राठोड, तनिष्का जाधव, आर्या लाड, अर्णव काळे यांनी काव्यवाचन केले.

सखी सिंग, भारत, अस्मी मांजरेकर, दीपादेवी प्रजापती, शर्वरी दामले, अभिषेक दांडेकर यांनी पोस्टर्स बनवले. विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम फारच माहितीपूर्ण झाला व अशा स्वरूपाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच आपापसातील ऋणानुबंध दृढ होण्यासाठी उपयुक्त असल्याची भावना सर्वानीच व्यक्त केली.

get_footer();