आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांमध्ये रुजवते राष्ट्रप्रेम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • January 30, 2024
Spread the love

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन, संचलन,‎ सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण‎

पुणे : “भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती विश्वव्यापी आहे,” असे मत माजी प्राचार्य डॉ. पितांबर पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या क्षमता ओळखून जबाबदारीने कार्य केल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे उद्योजक राजकुमार सुराणा यांनी सांगितले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पितांबर पाटील आणि उद्योजक राजकुमार सुराणा बोलत होते. पाहुण्यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत गायन झाले.
‘सूर्यदत्त’ चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला. प्रसंगी मेडिपॉईंट हॉस्पिटल्स प्रायव्हेटचे संचालक मनीष अग्रवाल, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, संचालक शीला ओक, संचालक प्रशांत पितालिया, प्रा.आरिफ शेख, प्रा.डॉ. सीमी रेठरेकर, प्रा मिथिलेश वर्मा, प्रा.हेमंत जैन, प्रा.दीपक सिंग, प्रा. अतुल देशपांडे, रोहित संचेती, भटु पाटील यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुलांनी संचलन केले. फुलांच्या रचना गाण्याच्या माध्यमातून सादर केल्या. सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ट्रॅव्हल अँड टुरिझमची विद्यार्थिनी रुचिता देशपांडे हिने ‘तेरी मिट्टी में मर जावा’ हे गीत सादर केले. सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ हेलथ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत राष्ट्रभक्तीची गाणी सादर केली. कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या नील जैन व श्रवण शिंदे या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. ११ वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी ‘आयो रे शुभ दिन आयो रे’ आणि ‘ये जो देश है मेरा’ या गाण्यावर बॉलिवूड तसेच शास्त्रीय नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.डॉ. पितांबर पाटील म्हणाले,”भारतीय परंपरा आणि संस्कृती सर्वोत्तम आहे. त्याचे जतन व संवर्धन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी आत्मसात कराव्यात. आपल्या आजूबाजूला पाहण्यापेक्षा अंतर्मनात डोकावून आत्मपरीक्षण करावे. आपल्यामधील ‘स्व’ची ओळख करून घ्यावी. तरुणांनी उत्साही, अभ्यासू आणि उद्यमशील असावे. हीच तरुण पिढी उद्याचे राष्ट्र ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने साकारणार आहे. अशी पिढी सूर्यदत्तमध्ये घडत आहे, याचा अभिमान वाटतो.
राजकुमार सुराणा म्हणाले,”तरुण पिढीमध्ये विविध क्षमता आहेत. सर्वानी स्वतःची जबाबदारी ओळखून पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची गरज आहे. भारत विविध अंगाने विकसित होत आहे. अशावेळी राष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवे. सूर्यदत्त नेहमीच सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूर्यदत्त रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, हा एक दुग्धशर्करा योग असून, २०४७ च्या सुवर्ण भारताची निर्मिती करू पाहणाऱ्या युवा वर्गाला सूर्यदत्त गेली २५ वर्षे घडवत आहे. राष्ट्रसेवा सर्व प्रथम हे संस्थेचे तत्व आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
मोक्षदा ब्रह्मे, सानिका जोशी, शरण्या चक्रवर्ती, रोहित सोनार, भारत शुक्ला आणि प्राचार्य वंदना पांड्ये यांनी सूत्रसंचालन केले. सोहळ्यात झालेले ध्वजवंदन, वाद्यवृंदांच्या तालावर झालेले शानदार‎ संचलन आणि देशभक्ती व राष्ट्रीय‎ एकात्मतेचे संदेश देणारे सांस्कृतिक‎ कार्यक्रमांमुळे सोहळ्यात सहभागी झालेले‎ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक भारावले हाेते.‎

get_footer();