आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 16, 2024
Spread the love

पर्वती पोलिसांची कारवाई

पुणे : जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. शशिकांत पाटोळे, ( वय-३२ वर्षे, रा. लेन नं.१४, दत्तमंदीर जवळ, जनता वसाहत, पर्वती) याला अटक करण्यात आले आहे.

त्याच्याकडुन गुन्हयांत चोरलेली दोन तोळे वजानाची सोन्याची चैन व दुचाकी असा १,३०,००० रुपये किमातीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, येथे जेष्ठ महिला फिर्यादी हया सायंकाळी रस्त्यावरुन पायी फिरत होत्या. त्यांच्या पाठीमागुन मोपेड चालकाने फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला होता. त्याबाबत पर्वती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयांचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहकारनगर भागामध्ये येण्याच्या व जाण्याच्या मार्गावर तांत्रिक विश्लेषणाव्दारे नमुद चेन स्नॅचरचा माग काढत होते. तेंव्हा पोलीस अंमलदार, प्रकाश मरगजे, अमित चिव्हे यांना दाखल गुन्हयांतील आरोपी हा लक्ष्मी रोड येथे गाडीसह उभा असल्याचे दिसुन आले.
ही माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवुन, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास पथकाच्या स्टाफसह रस्त्यांवर सापळा लावुन अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत कबुली दिली. अधिक तपास करता त्याने शेअर मार्केट मध्ये नुकसान झाल्याने चेन स्नॅचिंग केली असल्याचे सांगितले आहे. गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे हे करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि-०३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे,अमोल दबडे, दयानंद तेलंगे-पाटील, प्रशांत शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, सुर्या जाधव आणि सद्दाम शेख यांनी केली आहे.

get_footer();