आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्टॉक मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने फसवणूक

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून कोथरूड मधील एकाची १३ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर त्यांच्याशी संपर्क केला. स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळेल असे अमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन केला व फिर्यादी यांची १३,२५,०००/- ची आर्थिक फसवणूक केली आहे.

मे महिन्यात हा प्रकार घडला. वाट पाहूनही नफा न मिळाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करीत आहेत.

get_footer();