‘स्नेहालय‘ च्या माध्यमातून वंचित घटकांना आधार – डॉ. गिरीश कुलकर्णी
‘एचएनडी’मध्ये विद्यार्थी पुरस्काराचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे :‘स्नेहालय’च्या विविध २६ सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आधार मिळाला आणि उत्कृष्ट प्रकल्प उपक्रम साध्य झाला, असे स्नेहालयचे (अहमदनगर) येथील डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. नलिनचंद्र फुलचंद्र गांधी यांचा २९ वा स्मृतिदिनानिमित्त ‘एचएनडी’मध्ये विद्यार्थी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यातील एच.एन. डी.शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये यंदाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार इशान गांधी यांना देण्यात आला. या विद्यार्थी पुरस्कार कार्यक्रमात डॉ. गिरीश कुलकर्णी बोलत होते. यावेळी एचएनडीचे विश्वस्त चकोर गांधी, अधीक्षक सुरेंद्र गांधी, पराग दोषी, अनुराधा गांधी, आदित्य गांधी आणि प्रवीण शहा उपस्थित होते.
