आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वप्नीलने भारताला मिळवून दिले तिसरे कास्यपदक

Spread the love

पुणे : ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूरचा २८ वर्षांचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने गुरुवारी ५० मीटर रायफल श्री पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य जिंकून इतिहास रचला.

पात्रता फेरीत सातवे स्थान मिळविल्यानंतर कुसाळेने फायनलमध्ये ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावून देशाला आणखी एक पदक जिंकून दिले. चीनचा लियू युकून याने ४६३.६ गुणांसह सुवर्ण आणि युक्रेनचा सेरही कुलिश याने ४६१.३ गुणांसह रौप्य जिंकले. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा मान स्वप्निलने मिळविला.

भारताला आतापर्यंत तिन्ही पदके केवळ नेमबाजीत मिळाली, हा एक विक्रम आहे. पदक जिंकल्यानंतर स्वप्निल म्हणाला, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मी आदर्श मानतो. त्याच्याप्रमाणेच २०१५ पासून मध्य रेल्वेमध्ये मी तिकीट कलेक्टर आहे.

get_footer();