आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हडपसरमध्ये कुख्यात गुंडाचा खून

Spread the love

पुणे : दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी कुख्यात गुंडाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. ९)  हडपसर परिसरातील वंदे मातरम् चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून केलेल्या गुंडाचे नाव असून, त्याच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल दाखल आहेत.

शिवशरण आणि अल्पवयीन मुले एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रामटेकडी परिसरातील वंदे मातरम् चौकात शिवशरण आणि अल्पवयीन मुलांमध्ये दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. शिवशरण व मुलांनी मद्यपान केले होते.

या वादातून मुलांनी शिवशरण याच्या डोक्यात दगड घातला., तसेच दारूची बाटली फोडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवशरण याला पोलिसांनी ससूनमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वानवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दारूसाठी पैसे मागितल्याने झालेल्या वादातून शिवशरण याचा खून झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

get_footer();