आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हातभट्टी चालवणाऱ्या विमल राठोडवर स्थानबध्दतेची कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 16, 2024
Spread the love

पीसीबी गुन्हे शाखेचा दणका

पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात हातभट्टीवाल्या अट्टल महिला विमल राठोड यांच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

विमल राठोड, (वय ४३ वर्षे रा.स.नं. १४, बंजारा मित्र मंडळाजवळ, नाईकनगर, येरवडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे १ वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणारी अट्टल महिला गुन्हेगार ही अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगार आहे. तिने तिच्या साथीदारांसह येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर भेसळयुक्त हातभट्टी दारु विक्री करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये तिच्याविरूध्द ११ गुन्हे दाखल आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच तिच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे, यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ८३ वी कारवाई आहे.

get_footer();