हॉटेल श्रीमंतचे दिमाखात उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रणजीत मोटे यांच्या हस्ते हॉटेल श्रीमंतचे उद्घाटन करण्यात आले. कुंभेजा येथील प्राध्यापक सुरेश कोकाटे यांचे हे हॉटेल आहे.
बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक रणजीत मोटे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय मोरे, ऍड. नितीन शिंदे, परांडा शहराध्यक्ष हरी नाईकवाडे, गणीभाई हावरे, नंदकुमार शिंदे, कय्युम तुटके, राहुल गरड, समाधान खुळे, बबलू शिंदे, सुचित सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

`