आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१२ वर्षापासून हरवलेला मुलगा सापडला, आई-वडीलांना अश्रू अनावर

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police • February 2, 2024
Spread the love

मुंढवा पोलीसांनी मुलाला केले कुटूंबियांच्या स्वाधीन

पुणे : १२ वर्षापासून मिसिंग असलेला मुलगा सुखरुप कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे.

यावेळी मुलाला पाहून आई-वडीलांना अश्रू झाले अनावर झाले. मिसिंग व्यक्ती (वय ३८ वर्षे, रा. बुलढाणा) हा आपल्या राहत्या गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनामध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली, परंतू आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची व बिकट, अशिक्षित आई-वडील, मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करीत असल्याने कुटूंबाने अभ्यासाकरीता पुणे येथे जाण्याकरीता विरोध केला. काही दिवस उलटून गेले तरी देखील त्याच्या डोक्यातून पुणे येथे जाऊन अभ्यास करण्याचे खुळ गेले नव्हते. सन २०१२ मध्ये कोणास काही एक न सांगता तो घरातून निघून पुणे येथे आला, पुणे येथे अर्धवेळ (पार्ट टाईम) काम करुन अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यादरम्यान त्याने महाराष्ट्र लोकसेवा तसेच राज्यसेवा अंतर्गत वेगवेगळ्या पदाकरीता वेळोवेळी परिक्षा देखील दिल्या. परंतू स्पर्धा परिक्षामध्ये कोणतीही पोस्ट निघत नसल्याने व वारंवार अपयश येत असल्याने त्यास नैराश्य आले. या काळामध्ये तो मुंढवा पुणे येथे सन २०१७ पासून भाड्याने राहण्यास होता. एके सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो राहत्या भाड्याच्या रुममधून काही एक न सांगता निघून गेला. त्यामुळे मुंढवा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंद केली गेली. या मिसिंगच्या तपासामध्ये तांत्रीक विश्लेषन करुन या मुलाचा शोध घेण्यास पोलीसांना यश आले. या मुलाकडे अधिक चौकशी केली असता सन २०१२ मध्ये मुळगाव काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा येथून कोणास काही एक न सांगता स्पर्धा परिक्षेकरीता पुणे येथे आलो होतो. परंतू मला स्पर्धा परिक्षेत यश संपादन न झाल्याने नैराश्य आले होते. त्याचे नैराश्य व कुटुंबापासूनचा दुरावा याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुलाच्या राहत्या गावी सरपंच व आई वडील यांना संपर्क करुन माहिती दिली. प्रथम त्यांचा या माहितीवर विश्वास बसला नाही, त्यांनी वारंवार विचारणा करुन शहानिशा केली. तेव्हा त्यांना मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. मिसिंग मुलाचे वडील (वय ६५ वर्षे) आई (वय ५८ वर्षे) यांना त्यांच्या मुलास भेटल्यानंतर ऐकमेकांना पाहून डोळ्यातून आनंदाश्रू आले. याबाबत काटोडा गावचे सरपंच प्रदीप ढिगळे, वडील, आई व इतर नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले. तसेच पोलीसांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. ही कामगिरी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, आर राजा, सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार महेश पाठक, दत्ता जाधव, दिनेश भांदुर्गे, योगेश गायकवाड यांनी केली आहे.

get_footer();