आवृत्ती पुणे
← Back to Homepage

२ महिन्यांपासून फरार गुन्हेगाराला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 22, 2024
Spread the love

मुंढवा पोलीसांची कामगिरी

पुणे:- खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या अनुप ढगे या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे.

मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
अनुप ढगे (वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंढवा पोलीस स्टेशन कडील
दाखल गुन्हयातील आरोपी अनुप ढगे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन म्हणजेच गेल्या दोन महिन्यापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन फिरत होता. मुंढवा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश बोळकोटगी यांच्या आदेशाने मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. तेंव्हा तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की आरोपी हा उरुळी कांचन या ठिकाणी येणार आहे.
ही माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली. त्यांनी लगेचच तपास पथकातील अधिकारी संदिप जोरे यांना स्टाफसह माहितीच्या ठिकाणी जाऊन आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यांनी अत्यंत शिताफीने आरोपी यास उरुळीकांचन येथील पीएमटी बस स्टॅन्ड येथे सापळा रचुन ताब्यात घेतले.
आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग रंजनकुमार शर्मा , पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता रोकडे, दिनेश राणे, संतोष काळे, दिनेश भांदुर्गे संतोष जगताप, झुरंगे, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.

get_footer();