आवृत्ती पुणे
← Back to Homepage

६३ लाख ७२ हजार रुपयाची सुगंधी तंबाखू नष्ट

Spread the love

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे ६३ लाख ७२ हजार रुपयेचा साठा नष्ट करण्यात आला आहे.

एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये सोलापुर शहर व जिल्ह्यात ४१ ठिकाणी टाकलेल्या धाडीतील प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण ६३,७२,०४७ किंमत रुपयाचा साठा २० मार्च २०२४ रोजी में. किर्ती ॲग्रोटेक, मु. पो. बोरामनी, ता. दक्षिण सोलापूर या कपंनीच्या आवारात मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आलेला आहे.

हा साठा नष्ट करताना साहेबराव देसाई व सुनिल जिंतुरकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे, रेनुका पाटील, उमेश भुसे व नंदिनी हिरेमठ तसेच सोलापूर तालुका व मंद्रुप पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी हे उपस्थित होते.

get_footer();