आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोफत आरोग्य सेवा हीच माझ्यासाठी प्रेरणा : डॉ. राहुल घुले

Spread the love

आरसोली येथे भव्य नागरी सत्कार, शेतकऱ्यांशी साधला संवाद

भुम : भूम आणि परंडा तालुक्यात सुरू असलेली मोफत आरोग्य सेवा हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. याचे फलित मला नागरी सत्काराच्या माध्यमातून मिळत आहे, असे प्रतिपादन आरोग्यदूत डॉ. राहुल घुले यांनी केले.

आरसोली येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
डॉ. घुले म्हणाले, की डीपी नादुरुस्त झाल्यानंतर बांधावरून एमएसईबी कार्यालयापर्यंत डीपी ची वाहतूक करतांना शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेता मोफत शेतीच्या बांध्यावरून ते एमएसईबी कार्यालयापर्यंत मोफत डीपी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली असून डीपी दुरुस्त झाल्यावर एमएसईबी कार्यालय ते शेतीच्या बांध्यापर्यंत परत वाहतुकीसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आता पर्यंत 25 पेक्षा अधिक डीपी उचलण्यात आले आहेत. सावरगाव ता. भूम येथील शेतकरी बांधवांनी यासाठी आभार व्यक्त केले आहेत.
बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे दि.२ जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. भूमिपुत्रांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हजारो युवकांना रोजगार मिळणार असल्याचे तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान पाहवयास मिळत आहे. या रोजगार मेळाव्यात तालुक्यातील हजारो युवकांना मुलाकात देऊन नोकरी मिळवून घेण्याचे आवाहन आरोग्यदूत डाॅ. घुले यांनी केले.
डीपी दुरुस्तीसाठी सर्व मदत
आलेल्या पिकांना पाणी देण्याच्या मोसमालाच डीपीची नादुरुस्ती आपणास पहावयास मिळते. डीपी ने आण करण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला येत असून यातच पिके माना टाकून देण्याची भीती असते. वेळेवर पिकांना पाणी न मिळाल्यामुळे उत्पन्न घट होते. महावितरण शेतकऱ्यांना डीपी दुरुस्तीच्या माध्यमातून झटका देत असले तरीही मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. रोहित्राची (डीपी) दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांनी फक्त फोन करायचा आहे माझी टीम शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ते सुरु करेल, अशी ग्वाही डॉ. राहुल घुले यांनी त्रस्त शेतकऱ्यांना दिली.

get_footer();