आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस केली अटक

Spread the love

पुणे : अॅटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल राऊत, (वय-१९ वर्षे, रा. मु.पो. अंत्रोली, ता. वेल्हा, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन एकुण २,५५,००० रुपये किंमतीच्या तीन अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
केदार अपार्टमेंट रेणुका नगरी जवळ वडगाव-बुद्रुक सिंहगड रोड येथुन पार्किंगमधुन तीन चाकी अॅटो रिक्षा कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन घेऊन गेला. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीची सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिसरामध्ये पाहणी केली. अज्ञात आरोपीचा सखोल तपास करीत असताना तपास पथकातील सहायक पोलीस उप निरीक्षक आबा उत्तेकर, व स्टाप असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत व्यक्ती व गुन्हयाना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत होते. तपास पथकातील सहायक पोलीस उप-निरीक्षक, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोड येथे काळी-पिवळी रिक्षा घेऊन त्यामध्ये बसलेला आहे. ही रिक्षा त्याने चोरी केली असल्याची अशी खात्रीशीर माहिती आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता, योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. सचिन निकम यांनी सोबतच्या अंमलदार स्टाफ यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले असता एक व्यक्ती काळ्या-पिवळ्या रिक्षामध्ये ड्रायव्हर सीटवरुन निघुन जाण्याचे तयारीत असताना दिसला. त्याला वरील स्टाफच्या मदतीने जागीच पकडुन त्याचे नाव व पत्ता विचारला. त्यांच्याकडे त्याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच/१२/एनडब्ल्यु/९६२२ हीचे कागदपत्र व लायसन्सबाबत विचारता तो काही न बोलता तसाच शांत उभा राहिल्याने, त्याच्याकडे पुन्हा रिक्षाबाबत विचारणा करता, त्याने ही रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले. त्याने कात्रज चौक, सर्प उद्यान कात्रज, या ठिकाणाहुन तीन चाकी रिक्षा चोरी केल्याचे सांगितले आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक, गणेश मोकाशी हे करीत आहेत. अटक आरोपीकडून ३ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अभय महाजन, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, गणेश मोकाशी, संजय शिंदे, राजु वेगरे, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांचे पथकाने केली.

get_footer();