आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालघनने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

येरवडा लक्ष्मीनगर चौकातील घटना : दुचाकी व चारचाकी वाहनांचे केले नुकसान

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चारचाकी -दुचाकींचे हत्याराने नुकसान करीत तू सेवक चौकात राहतो का, परत इथं दिसायचे नाही, असे म्हणत पालघनने मानेवर वार करून गंभीर जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज (शनिवार, दि. २५ सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास सेवक चौक ते संभाजी चौक, लक्ष्मीनगर, येरवडा येथे घडली.

शेखर भालेकर (वय ३३, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घरी जात असताना सेवक चौक ते संभाजीनगर चौक, लक्ष्मीनगर, येरवडा येते चार अज्ञातांनी चारचाकी-दुचाकींचे धारदार हत्याराने नुकसान करीत पालघनसारख्या हत्याराने परिसरात दहशत माजविली. फिर्यादीला अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तू सेवक चौकात राहतो का, परत इथ दिसायचं नाही असे म्हणत पालघनने मानेवर वार करून जखमी केले.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. वारंगुळे करीत आहेत.

get_footer();