आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • September 26, 2022
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज गोकुळनगर येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात गोकुळनगर ज्येष्ठ नागरिक संघ, माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मशीनद्वारे हाडातील कॅल्शियमची तपासणी करून गरजूसाठी मोफत कॅल्शियमची औषधे वाटप करण्यात आली. याचा 274 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. एन. जे. कर्णे, मानसोपचार तज्ञ डॉ. झेनाब लोखंडवाला, माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब कात्रजचे संस्थापक व झोन चेअरपर्सन विठ्ठलराव वरुडे पाटील, कात्रज लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ. सतीश कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कोरेकर त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य, कात्रज लायन्स क्लबचे सदस्य व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील स्थानिक मान्यवर मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरोग्य शिबीर छान झाले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकानीं दिल्या तर डॉ. झेनाब लोखंडवाला व डॉ. एन जे कर्णे यांनी देखील मार्गदर्शन केले.

या शिबिराबाबत विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी जेष्ठ नागरिकांच्या विविध व्याधीवर उपचारासाठी अनेक आरोग्य शिबिरे घेतली आहेत. यातून हजारो रुग्णांना याचा लाभ झाला असून यापुढे देखील रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून हे रुग्णसेवेचे वृत्त सतत पुढे चालत राहील असे सांगितले आहे.

get_footer();