आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टलच्या अध्यक्षपदी सेजल कटारिया

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW - Spiritual News, Other, People, Social • January 13, 2024

जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टल 2024 -25 कमिटी: PRO अभिजीत डुंगरवाल

पुणे: शांतीनगर परिसरात मागील दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टलच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सेजल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर अभिजीत डुंगरवाल यांना पुन्हा PRO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

JSG PUNE CRISTAL हा अतिशय छान प्रोग्राम घेणार ग्रुप म्हणून मागील दोन वर्षापासून प्रसिद्ध आहे. या ग्रुप मुळे भागातील अनेक परीवार एकमेकांना ओळखायला लागले असून. यातून अनेकांचे व्यवसाय देखील वाढले आहेत. JSG PUNE CRISTAL मध्ये एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, पिकनिक, सोशलवर्क या सोबत मेंबरच्या व्यवसाय वाढीकडे देखील लक्ष दिले जाते. यावर्षीची नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष सेजल कटारिया, P.R.O. अभिजित डुंगरवाल, बबिता खाटेर उपाध्यक्ष गोकुळ रुणवाल, राहुल कर्नावट, दिलीप गुगळे, सह सचिव डॉ.अंकिता लोढा, खजिनदार अंकिता शिंगवी, सह खजिनदार वर्षा ओस्तवाल, कमिटी मेंबर्स आनंद कटारिया, मयुरी बेदमुथा, निता पोखरणा, स्वाती कटारिया, वर्धमान छाजेड यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

get_footer();