आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणाऱ्या रुद्र ढिलेवर स्थानबध्दतेची कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 13, 2024
Spread the love

पीसीबी गुन्हे शाखेचा दणका

पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, पवन उर्फ रुद्र ढिले या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

पवन उर्फ रुद्र ढिले, (वय २२ वर्षे रा.१२७८, शेख सल्लाउद्दीन दर्या जवळ, कुंभार वाडा कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोंढवा समर्थ, फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, सत्तुर या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुन, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन दादासाहेब चुडप्पा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ८१ कारवाई आहे.

get_footer();