आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन पुणे पोलीसांना प्रशस्तीपत्रक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 13, 2024
Spread the love

पुणे: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन पुणे पोलीसांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. अशी माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.

पुणे शहर पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी, इंगवले व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस अंमलदार अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांचा पोलीस आयुक्त कार्यालय याठिकाणी सन्मान करण्यात आला. शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार प्रदिप चव्हाणव अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्री गस्त घालत होते. रात्री २.३० वाजता त्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना ताब्यात घेतले होते. तेव्हा रात्री कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या व्यक्ती रहात असलेल्या ठिकाणाच्या घरझडतीसाठी गेले असताना त्यांच्या घरझडती मध्ये एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळुन आली होती. त्यामध्ये संशईत हे देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय आला. त्यांच्याकडे अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्याविरुध्द कोथरूड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) यांच्याकडुन या आरोपींवर रोख १० लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी इंगवले हे मुंबई येथुन पोलीस अमंलदार अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यासाठी आयुक्तालयात उपस्थित राहीले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी इंगवले यांच्या हस्ते कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलिमा पवार यांचा देखील यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस सह आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया हे उपस्थित होते.

get_footer();