आवृत्ती पुणे
← Back to Homepage

14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा बॅडमिंटन प्रशिक्षक जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 5, 2021
Spread the love

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बालेवाडी येथील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातील बालेवाडी येथे बॅडमिंटन प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅडमिंटन प्रशिक्षकाने 14 वर्षीय बॅडमिंटनपटू असलेल्या मुलीचा विनयभंग केला. ही घटना समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बॅडमिंटन प्रशिक्षक राकेश यशवंत दलाल (वय-36 रा. फ्लॅट नं. 301, 3/ई बिल्डींग , नांदे रोड, म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 14 वर्षाच्या मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात 354,354(अ), लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम7 सह 8,9(ओ),10 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राकेश दलालने गेल्या वर्षापासून बॅडमिंटनचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बालेवाडी स्टेडीयम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ही घटना घडली. शनिवारी सकाळी आरोपीने पीडित मुलीला शटल बॉक्स हा जिममधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. तिच्या मागे आरोपी देखील गेला. त्यानंतर आरोपी राकेशने मुलीसोबत बोलण्यास सुरुवात केली. तू शुक्रवारी खेळायला का येत नाहीस? तू चांगली खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडतो. मला तुला फार वरती घेऊन जायचं आहे. तू आज देखील चांगली खेळली आहेस, असे म्हणत राकेशने मुलीकडे शेकहॅन्डसाठी हात पुढे केला. राकेश कौतुक करत असल्याने मुलीनेदेखील त्याला शेकहॅन्ड केले. तेव्हा राकेशने तिला जवळ ओढत मिठी मारली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु राकेशने मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने आईला दिली. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी राकेश दलाल विरोधात तक्रार दिली.

मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी राकेशला अटक केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

get_footer();