आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 5, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची जोरात धडक बसून अपघात झाला त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील हॉटेल हरिओमसमोर हा अपघात झाला.

ओंकारसिंग अभयसिंग ठाकूर (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्रसिंग ठाकूर (वय ३९, रा. कोंढवा, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मोटारसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादीच्या पुतण्याच्या डोक्या, गुडघ्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक न थांबता पळून गेला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

get_footer();