आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खून झालेल्या मुलाच्या दागिन्यांचा अपहार करणार्‍यास अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 7, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक : 16 लाखांचे होते दागिने

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खून झालेल्या मुलाच्या अंगावरील १६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने सुरक्षित राहावे म्हणून त्याच्या वडिलांनी एकाकडे ठेवायला दिले होते. त्याचा अपहार करणार्‍यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

झाकीर हुसेन बाबु भोला (वय ३५, रा. आनंद मठसमोर, जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, त्यांचा मुलगा समीर ऊर्फ लाल बादशाह हुसेन मनुर याचा खून झाला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर १६ लाख ५० हजार रुपयांचे ५८ तोळे सोन्याचे दागिने होते. त्यांचा भाऊ नूर महंमद मनुर याने हे दागिने पोलिसांकडून घेऊन फिर्यादी यांना दिले होते. त्यांनी ते सुरक्षित ठेवण्यासाठी ६ डिसेंबर २०२१ रोजी झाकीर हुसेन बाबु भोला याच्याकडे दिले होते. फिर्यादी यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी हे दागिने भोला याच्याकडे परत मागितले. तेव्हा तो पळून गेला व लपून राहून दागिने परत न करता त्याचा अपहार केला. मनुर यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केल्यावर पोलिसांनी भोला याला अटक केली आहे.

get_footer();