आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम येथे शाकंभरी महोत्सवाची लगबग सुरु

Spread the love

कोष्टी समाजाच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बार्शी : येथील समस्त कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्ताने दहाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडप उभारणीचे काम सुरू झाले. या मंडप उभारणीचा शुभारंभ समाजातील जेष्ठाच्या हस्ते करण्यात आला.

दिनांक १८ जानेवारीपासून शाकंभरी महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भूम येथील समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह गेल्या दहा वर्षापासून आयोजित केला जात आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ धार्मिक विधीनुसार रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला.
दिनांक १८ जानेवारी ते २५ जानेवारी या सप्ताह दरम्यान ह.भ.प. स्वरगंधर्व प्रकाश जंजिरे, वारकरी भूषण एकनाथ चत्तर शास्त्री, विनोदाचार्य दयानंद कोरेगावकर, रामायणचार्य माधव रसाळ, धर्मगुरू अमृताश्रम जोशी, ह.भ.प. जयवंत बोधले, तुकाराम मेहुणकर महाराज यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवार (दि.२०) रोजी ह.भ.प. गोविंद गायकवाड महाराज आळंदीकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच काकडा, भजन, देवांग पुराण, गाथा भजन, तुळशी रामायण, हरिपाठ, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.
मंडप उभारणीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान समाजातील जेष्ठ बांधव नारायण बागडे, अंबादास वरवडे, पांडुरंग वरवडे, आबासाहेब नवले, योगेश आसलकर, विठ्ठल बागडे, पत्रकार शंकर खामकर, पत्रकार शाम बागडे, अतुल उपरे, प्रकाश बागडे, चत्रभुज पाकले, ज्ञानेश्वर टकले, संदीप खामकर, राजश्री वरवडे, उज्वला बागडे, सत्यभामा बोत्रे, साधना कोकणे, अलका आलगट आदींची उपस्थिती होती.

get_footer();