आवृत्ती पुणे
← Back to Homepage

15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 13, 2021
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा : मुलीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने नकार दिल्यावर शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान लोहगाव, पोरवाल रोडवरील लॉजवर घडला आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी धानोरीमधील एका १७ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळस येथील एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी तिला एका १७ वर्षाच्या मुलाने मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादी यांच्या राहते घरासमोर त्यांच्या मुलीचा हात धरुन तिला सोबत चल असे बोलला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्याबाबत आता तक्रार दिल्याने पोलिसांनी पोक्सो खाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.

get_footer();