आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१७ वर्षीय मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 30, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : पोहोता येत नसल्याने घडली दुर्घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या सतरा वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली.

दयानंद प्रकाश रणदिवे (वय १७, रा. कळंब जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, दयानंद हा कोरेगाव मूळ या ठिकाणी नातेवाईकांकडे आला होता. नातेवाईकांची दोन मुले व दयानंद याला गुरे राखण्यासाठी पाठवले होते. गुरे राखण्यासाठी गेल्यानंतर तिघेजण कोलते वस्ती येथील एका विहीरीवर पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. परंतु दयानंदला पोहता येत नसताना तो पाण्यात उतरला. तसेच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने व विहीरीत असलेल्या गाळामुळे त्याला पाण्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे त्याठिकाणी असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

दयानंदचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेड, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दयानंदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, पोलीस शिपाई किशोर कुलकर्णी, भगत, कोरेगाव मूळच्या पोलीस पाटील वर्षा कड, स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.

get_footer();