आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Social • January 5, 2024
Spread the love

चंदननगर पोलीसांची कामगिरी

पुणे : टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

अनुज यादव, (वय-१९ वर्षे, रा. गंगोत्री निवास, वडगाव-शेरी) हरिकेश चव्हाण,( वय १८ वर्षे, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी) आकाश पवार, (वय-२३ वर्षे, रा., वडगाव शेरी) अमोल चोरघडे, (वय-२३ वर्षे, रा. वडगाव शेरी) संदेश कांबळे, (वय-२५ वर्षे, रा. वडगाव शेरी) अक्षत ताकपेरे, (वय-२० वर्षे, रा. वडगाव-शेरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर राहुल बारवसा, (वय-२३ वर्षे, रा. वडगाव शेरी) हा पाहीजे आरोपी आहे.
आनंद पार्ककडुन वडगांव शेरीकडे जाणाऱ्या रोडवरील पवन सुपर मार्केटचे शेजारी दिगंबरनगर वडगांव शेरी याठिकाणी फिर्यादी हे त्यांचा मित्र ऋषीकेश ढोरे याचे आकाश पवार याच्यासोबत झालेली भांडणे मिटविण्यासाठी गेले. तेव्हा आकाश पवार याने ऋषीकेश यास मारहाण केली. अनुज यादव याने त्याच्याकडे असलेल्या धारधार हत्याराने ऋषीकेश याला जीव ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच अनुज याचे साथीदार आकाश पवार, हरिकेश चव्हाण, अमोल चोरघडे, अक्षत ताकपेरे, राहुल बारवसा व इतर मुलांनी मोठ-मोठ्याने शिवीगाळ करुन तेथे पडलेल्या दगड व विटांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी, अभि आगरकर व योगेश असे ऋषीकेशला वाचविण्यासाठी गेले असता, अनुज याने त्याच्याकडे असलेल्या धारधार हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यावर तसेच अभि आगरकर व योगेश याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले.त्या भागात दहशत निर्माण करीत निघुन गेले.
आरोपी अनुज यादव व त्याच्या इतर साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्यानुसार ते अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. या टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजन कुमार, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उप- निरीक्षक, दिलीप पालवे, पोलीस उप-निरीक्षक, अरविंद कुमरे, पोलीस उप-निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार, राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही ११० वी कारवाई आहे.

get_footer();