आवृत्ती पुणे
← Back to Homepage

२० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 16, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : खराडी-लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये युवतीवर बलात्कार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शेजारी राहणार्‍या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरुणी व आरोपी तरुण हे लोणी काळभोरमध्ये एकमेका शेजारी राहण्यास आहेत. १३ जानेवारी रोजी या तरुणाने तरुणीला आपण बाहेर जेवायला जाऊ. मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, असे म्हणून तिला रात्री आठ वाजता खराडी येथील पाजी दा ढाबा येथे कारमधून आणले. तेथे जेवण केल्यानंतर परत घरी जाताना त्याने खराडी ते लोणीकाळभोरकडे जाणार्‍या रस्त्यावर आडबाजूला कार थांबविली व तिथे तिच्यावर बलात्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.

get_footer();