आवृत्ती पुणे
← Back to Homepage

माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनविणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 24, 2021
Spread the love

एकावर गुन्हा : पुणे सायबर पोलिसांनी गुजरातमधून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विविध आजारांचे निदान करणार्‍या माय लॅब या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करत नवीन बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे खोटी सेल्स ऑर्डर तयार करून लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरात येथील दोघांना अटक केली.

संस्कार संस्कृत उर्फ रुषी (वय १९) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुट्टू (वय २४, दोघेही रा. जामनगर, गुजरात) या दोघांना अटक केली असून, भावेश पासवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. चेतन सोनराज रावळ (वय ३४, रा. बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०२१ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली.


पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीचे नाम साधर्म्याचा वापर करून त्यासारखे मायसेल्स डॉट कॉम हे नवीन डोमेन तयार केले. त्यानंतर फिर्यादीच्या नावाने ईमेल प्रोटेक्टेड हा ईमेल तसेच फिर्यादीचे फर्मच्या नावाने लोगो तयार केला. त्यामार्फत बनावट सेल्स ऑर्डर तयार केली. तसेच, आरोपींनी एक बनावट फेसबुक पेज तयार करून त्यामार्फत फिर्यादीची कंपनी ही कोरोनाच्या चाचणी किट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ईमेल, बँक खाती, फोन नंबर द्वारे लोकांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


आरोपींनी तयार केलेल्या डोमेनबाबत तपास करण्यासाठी, गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

get_footer();