आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हिंगणेमळा रस्त्यावर कोयता घेऊन थांबलेल्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 24, 2021
Spread the love

आर्म ॲक्टनुसार गुन्हा : हडपसरमध्ये दरोडा व वाहनचोरी पथकाची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर-हिंगणेमळा येथे कोयता घेऊन थांबलेल्या संशियताला दरोडा व वाहनचोरी पथकाने जेरबंद केले. आर्म ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली. यापू्र्वी या गुन्ह्यातील दोघांवर कारवाई केली आहे.

प्रथमेश सूर्यवंशी (वय 20, रा रामोशी आळी, हडपसर गावठाण, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आर्म ॲक्टनुसार ओंकार कोरडे व ज्योतिबा शिंदे यांना यापूर्वीच अटक केली आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे अधिकारी व अंमलदार हडपसर पोलीस स्टेशनहद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी हिंगणेमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घातक हत्यारे घेऊन संशयित थांबल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर व पोलीस हवालदार विनायक रामाणे यांना सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जात संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीचा कोयता मिळून आला. आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, गणेश लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();