आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेऊन बनवली व्हीडिओ क्‍लिप

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021
Spread the love

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

एका घरमालकाने मोलकरणीच्या गरीबीचा फायदा घेत, तीच्या सोबत शारीरीक संबंध ठेवले. हे संबंध ठेवल्याचे छुपे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. मोलकरणीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर हे चित्रीकरण तिच्या पतीच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


हीम्मतसिंग धीमान (रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय मोलकरणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरमालकाविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पिडीत महिला घरकाम करण्यासाठी धीमान यांच्या घरी येते. त्याने तीच्या गरीबीचा फायदा उठवत तीच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर संबंधाची नकळत व्हिडिओ क्‍लिप बनवली. ही क्‍लिप तीला दाखवत कोणाला काही एक सांगू नको मी तुझ्या सोबत लग्न करतो, तुझ्या दोन मुलांना संभाळतो असे आमिष दाखवले. तीने नकार दिल्यावर मात्र चित्रीकरणाची क्‍लिप पतीच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवली.

याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख करत आहेत.

get_footer();