आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जादुटोणा करून 2 कोटींची फसवणूक, आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News Slider, Other, Social • January 4, 2024
Spread the love

समर्थ पोलीसांची कारवाई

पुणे : जादुटोणा करून 2 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात समर्थ पोलीसांना यश आले आहे. अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व महिला आरोपी सीमा उर्फ रोहा अब्दुल हुसेन नईमआबादी यांना अटक करण्यात आले आहे.

फिर्यादी व साक्षीदार या व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख ५५ हजार फसवणूक झाली होती. त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण ६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात आरोपींवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणुक केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तसेच लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील रक्कम १ कोटी ०६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गेल्या ४ महीन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला चार गुन्हे मिळून एकूण रक्कम ०६ कोटी २३ लाख ०५ हजार इतक्या रूपयांची फसवणूक केल्याने गुन्हे दाखल झालेले आहेत.
आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वेगवेगळ्या तपास यंत्रणेला दिलेले होते. त्यानुसार समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व पोलीस निरिक्षक, प्रमोद वाघमारे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. आरोपी ४ महिने त्यांचे घर लॉक करून फरार झाले होते. आरोपींना शोधण्याचे पोलीसांना मोठे आव्हान होते. परंतू पोलीस उप- निरीक्षक सौरभ थोरवे व पोलीस अंमलदार, हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण केले व त्यांना माहीती मिळाली की गुन्हयातील आरोपी हे कॅम्प परिसरात सोसायटीत लपून बसलेले आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांच्या आदेशाने स्टाफच्या मदतीने दोन्ही आरोपींना सापळा रचून सोसायटीमधून ताब्यात घेतले. आरोपींना समर्थ पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आले. आरोपींना ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-१, संदीप गिल, सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, अशोक धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती कुटे, दत्तात्रय भोसले, संतोष डमाळे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, शरद घोरपडे, प्रफुल्ल साबळे, म. पोलीस अंमलदार, निलम करपे, सीमा गायकवाड, स्वाती भालेराव यांनी केली आहे.

get_footer();