आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोनसाखळी चोरणारे ७ आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 4, 2024
Spread the love

लोणीकंद पोलीसांची कारवाई

पुणे : अभिवादन सोहळयास आलेल्या अनुयायांची सोनसाखळी चोरणाऱ्या ७ आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

महिला आरोपी अरुणा गायकवाड (वय ४०, वर्षे, रा. नुराणी गल्ली, नागेश शाळेचे पाठीमागे जामखेड, जि. अहमदनगर) रुषीकेश जाधव (वय २२ वर्षे, रा. गांधीनगर, नुर कॉलनी, तेलगाव नाका ता. जि. बीड) अनिल पवार (वय २२ वर्षे, रा. नवगण राजुरी, खडकवस्ती जि. बीड) सचिन गुंजाळ (वय ३५ वर्षे, रा. खडकी देवळा, ता. वडवणी जि. बीड) शंकर गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. नाळवंडी नाका ता जि.बीड) मिलींद शिंदे (वय २० वर्षे रा. एन १२टीव्ही सेंटर जवळ, शताब्दीनगर, ता. जि. औरंगाबाद) नितेश बोधणकर (वय ३४ वर्षे, रा. मु. पो. पिंपळगाव, बहीणाई ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती) यांना पोलीस कस्टडीची रिमांड मंजुर केलेली आहे.
लोणीकंद पोलीस ठाणे हददीत पेरणे गाव येथील पेरणे जयस्तंभ अभिवादनास लाखो अनुयायी मोठया प्रमाणात आले होते. या जयस्तंभ अभिवादनास आलेले अनुयांयी हे पेरणे टोल नाका, पुणे नगर रोड येथुन बसमधुन प्रवास करुन अभिवादनास जाण्याकरीता बसमध्ये चढत होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
संशयीत व्यक्तींनी जयस्तंभ ते पेरणे टोलनाका परीसरात सोनसाखळी चोरल्या होत्या. त्यातील चोरी करणा-या व्यक्तींना नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याच दिवशी अटक केली आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपींवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गुन्हयांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र गोडसे, गजानन जाधव, शिरीष भालेराव हे करीत आहेत.

get_footer();