आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लॅपटॉप चोरणारा आरोपी सापडला जाळ्यात

Spread the love

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी

पुणे : अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यास भारती विदयापीठ पोलीसांना यश आले आहे.

रोहीत साठे, (वय २० वर्षे, रा. गुजरवाडी, खोपडेनगर, कात्रज) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडुन ४,५०,००० रुपये एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप व २५,००० रुपयाचे दोन मोबाईल फोन असा एकुण ४,७५,००० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत होते. पोलीस अंमलदार, निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत आहे. तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जाऊन पाहता तेथे आरोपी हा अॅपल कंपनीच्या महागड्या लॅपटॉपसह व दोन मोबाईल फोनसह मिळुन आला. त्याच्याकडे तपास करता त्याचे ताब्यातील अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप हा गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश खैरमोडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();