आवृत्ती पुणे
← Back to Homepage

25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विक्रांत शिवणकरवर खंडणीचा गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 7, 2022
Spread the love

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : २७ एप्रिल २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुंबईतील कंपनीला दिलेल्या कामाचे उर्वरित पैसे देण्यासाठी फोन करुन धमकी देऊन व्यावसायिकाकडे 25 लाखाची खंडणी मागणाऱ्यावर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 एप्रिल 2022 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात घडला.

पुण्यातील विक्रांत सुरेश शिवणकर (वय-30 रा. जगदंब भवन रोड, पिसोळी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रेनिक पुखराज ओसवाल (वय-35 रा. मार्केट यार्ड, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांनी डिसेंबर 2021 मध्ये दिल्ली येथील इंडिया गेट येथील आर्मी शोचे काम घेतले होते. हे काम त्यांनी मुंबईतील नरेंद्र राहुरीकर यांच्या डी फाईन आर्ट या कंपनीला दिले होते. कामाच्या मोबदल्यात राहुरीकर यांना 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी 15 लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता. मात्र, डी फाईन आर्ट कंपनीने व्यवस्थित काम न केल्याने फिर्यादी यांनी इतरांकडून ते काम पूर्ण करुन घेतले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, त्यांनी नरेंद्र राहुरीकर यांना फेब्रुवारी महिन्यात वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये कोणताही व्यवहार झालेला नसताना आणि फिर्यादी हे कोणतेही पैसे देणे लागत नसताना 27 एप्रिल रोजी रात्री आरोपी विक्रांत शिवणकर याने फिर्यादी यांना फोन करुन नरेंद्र राहुरीकर याच्या कंपनीचे राहिलले 25 लाख रुपयांचे पेमेंट कधी देणार अशी विचारणा केली. तसेच तुला पेमेंट द्यायचे आहे का नाही, तुझे घर व ऑफिसचा पत्ता मला माहित आहे. तुझ्या घरातील लोकांची, मित्रांची मला माहिती आहे. तुझ्या घरी येतो, पोरं पाठवतो अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे 25 लाखाची खंडणी मागितली. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.

get_footer();