आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शासकीय कामात अडथळा आणणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

शिवाजीनगर गावठाणातील प्रकार : वीज मीटर कट केल्याच्या रागातून मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वायरमनने वीजमीटर कट केला म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाणमधील जोशी गल्लीमध्ये घडला.

अक्षय भारती (वय ३७, रा. जोशी गल्ली, शिवाजीनगर गावठाण, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश पाटील (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, वायरमनने आरोपीचा वीजमीटर तोडून नेला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला अडवून आमचा वीजमीटर का काढून घेतला, असा जाब विचारत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.


get_footer();