आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पहिला पती व प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कंजारभाटनगर येथील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घटस्फोट घेतल्यानंतर पहिला पती व प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळून घटस्फोटित महिलेने आत्महत्या केली. ही घटना मनसे कार्यालयासमोर, कंजारभाटनगर, येरवडा येथे २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

अपर्णा अनिल अभंगे (वय २२, रा. कंजारभाटनगर, येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री अनिल अभंगे (वय ४०, रा. मनसे कार्यालयासमोर, कंजारभाटनगर, येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार सोहम राजू गागडे (रा. इचलकरंची, जि. कोल्हापूर) आणि गिरीष प्रवीण मछले (रा. मुरुमगाव, सोमेश्वर कारखाना, ता. बारामती, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची मुलगी अपर्णा हिचा विवाह सोहम राजू गागडे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांच्याबरोबर झाला. लग्नानंतर तिचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली, त्यामुळे अपर्णा हिने कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट घेतला. त्यानंतर फिर्यादीची मुलगी अपर्णा हिचे गिरीष प्रवीण मछले (रा. मुरुमगाव, सोमेश्वर कारखाना, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याशी प्रेम जुळले व ती त्याच्याशी लग्न करणार होती. दरम्यान, तिचा पहिला पती सोहम गागडे हा देखील अपर्णाशी लग्न करून संसार करणार होता. मात्र, अपर्णाचा पहिला पती सोहम आणि प्रियकर गिरीष या दोघांनी लग्न करण्याकरिता मानसिक छळ केला. त्यामुळे छळा कंटाळून तिने २५ ऑगस्ट २०२१ रोजी राहत्या घरी साडेसहा वाजता आत्महत्या केली.

तपासादरम्यान येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर करीत आहेत.

get_footer();