आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा नोकर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 10, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वडिलांबरोबर काम करणार्‍या नोकराने ११ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून ११ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या २५ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना उरळी कांचनमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली.

याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या पतीसोबत २५ वर्षाचा आरोपी काम करतो. त्यांच्याच वस्तीत राहतो. त्याने फिर्यादीच्या ११ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने बाथरुममध्ये ओढत घेऊन गेला.

तेथे तिच्यावर तीन ते चार वेळा लैगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली.
या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. याबाबत तिच्याकडे आईने चौकशी केल्यावर तिने हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या नोकराला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.

get_footer();